ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी
विज्ञान शाखेतील गणेश रामदास लांडे ७८ टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम तर कला शाखेमधून शामुवेल अशोक टेकाम ७७ . ६७ % गुण प्रथम क्रमांक तर कु.किरण पवण गोंडे या विद्यार्थिनीने ७५.६७ टक्के गुण प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेचा काल दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.झरी तालुक्यात ७५.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे .तालुक्यात नऊ उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.या सर्व उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण ६८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यापैकी ६७६ परीक्षा फॉर्म भरला होता असून त्यापैकी केवळ ५९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

तालुक्यातून ३ विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत गुरु प्राप्त केल्या त्यापैकी दोन विद्यार्थी हे मातोश्री पुणकाबाई वि.जा .भ.जा.कला विज्ञान कनिष्ठ विद्यालयाचे असून एक विद्यार्थी राजीव उच्च माध्यमिक झरी येथील आहे या पैकी,१८४ प्रथम श्रेणीत ३०९ द्वितीय श्रेणीत ,१०३ पासग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत .
तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.राजीव कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, झरी – ९०.७८ % , राजिव ज्युनिअर कॉलेज पाटण – ९७.७० % , आदर्श कनिष्ठ महाविद्यालय मुकुटबन -७७.३३ % ,शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिबला – ९४ . ८७ % , सूर्यतेच उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी – ६९ . ५६ % सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय बाळापुर – ६३.३३ % ,मातोश्री पुणकाबाई वि .जा. भ .जा.कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय – ९५.९१ % बालाजी कनिष्ठ महाविद्यालय मार्थाजून ८६.२० % , ‘सूर्यतेच विज्ञान जुनिअर कॉलेज झरी ९७.८७ % असा निकाल लागला आहे .