सध्या झरीला लाभले तहसीलदार राजेश वैष्णव यांना निवडणुकी पुरते न ठेवता,कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी
ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी
झरी तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून प्रचलित असून या तालुक्यातील तहसील कार्यालचा कारभार हा विशेषतः प्रभारी पदावरच असून या तहसील कार्यालयामध्ये कायमस्वरूपी तहसीलदार मिळावे यासाठी तालुक्यातून मागणी होत आहे .
मागील वर्षी तहसीलदार गिरीश जोशी यांची बदली झाल्यानंतर त्यांचे तहसीलदार हे पद रिक्त होते व प्रभारी तहसीलदार म्हणून महेश रामगुंडे यांनी कार्यभार सांभाळला त्यांची बदली मारेगाव येथे झाल्याने येथे पुन्हा तहसीलदार हे पद रिक्त झाले.त्यामुळे निवडणुकीपुरते राजेश वैष्णव यांची तहसीलदार पदी नियुक्ती झाली असून या निवडणुक झाल्यानंतर तालुक्यात अवैद्य रेती तस्कर मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आल्याने रेती तस्करावर कार्यवाही करण्यासाठी चार पथके नेमून दिले असून सदर पथके कार्यवाही सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
परंतु रेती तस्करांचे हेर प्रत्येक घाटावर असल्याने तस्करावर कार्यवाही करताना मोठी अडचण होत असून सुद्धा तालुक्यातील दुर्भा घाटावर तहसीलदार राजेश वैष्णव यांचे मार्गदर्शनानुसार व नायब तहसीलदार राजेंद्र मसराम यांच्या सहकार्याने ३ रेती भरलेले ट्रॅक्टर पकडण्यात आले असून या पंधरा दिवसांमध्ये तालुक्यात ६ रेती तस्करावर कार्यवाही करण्यात आली आहे या पथकात वाहन चालक वसंता मडावी तलाठी राजू मोरे व तलाठी बाला गायकवाड यांनी कार्यवाही करून पोलीस स्टेशन पाटण यांचे कडे रेती भरलेले ट्रॅक्टर सुपूर्त केले आहे.तहसीलदार राजेश वैष्णव यांचे कार्य चांगले असल्याने कायमस्वरूपी तहसीलदार म्हणून झरी येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे .