देऊळकर यांच्या घराचे छप्पर उडाले
झाडे सुद्धा गळून पडली
सुरेश पाचभाई मारेगाव
नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावातील घराचे छप्पर उडले असून भाजीपाला तसेच फळबागेचेसुद्धा मोठे नुकसान झालेले आहे.झाडे सुद्धा गळून पडलेली आहेत.
दि. 22 मे ला दुपारी एकाएकी आकाशामध्ये ढग दाटून आले.आणि विजेच्या कडकड्यांचा जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. अशातच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली.यात तालुक्यातील अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान झाले. चोपण येथील अनिल देऊळकर यांच्या घरावरील छप्पर उडून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. म्हैसदोडका येथील अनेकांचे घरांचे नुकसान झाले असून इलेक्ट्रिक पोल सुद्धा पडले आहे.

अनिल देऊळकर यांचे टिन आणि कवेलूचे पक्के घर होते.ते आपल्या कुटुंबियांसोबत याच घरामध्ये राहून उदरनिर्वाह करीत होते.अल्पभूधारक असलेल्या अनिल देऊळकर यांचा संसार उघड्यावर आला आहे.भर उन्हाळ्यात पाऊस मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग वैतागलेला असून शेतीची कामेही खोळंबलेली आहे.

सततच्या होणाऱ्या वादळ वाऱ्याने अनेकांचे नुकसान होत असून शेतकरी अनिल देऊळकर यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरातील धान्यही ओले झाले आहे. ऐन दुष्काळाच्या दिवसामध्ये शेतकऱ्यावर संकट कोसळले असून शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.