सुरेश पाचभाई मारेगाव,
कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्कार सोहळा नुकताच पार पडला, होता 2023 मध्ये झालेल्या 61 व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये मेडल मिळविणाऱ्या खेळाडू तथा सहभागी खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.

मुळगाव चिं. बोटोणी,तालुका मारेगाव सध्या राहणार कोंढवा बुद्रुक , पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिने मुलीच्या 5 ते 7 वयोगटात महाराष्ट्र राज्यासाठी कांस्य पदक पटकाविले होते,तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत एक सुवर्ण व एक रजत पदक मिळविले होते तिच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष श्री.पी के सिंह सर,टीम इंडिया कोच श्री.श्रीपाद शिंदे सर,पुणे स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष श्री.राजेंद्र जोशी सर आणि कल्याण पत्रकार संघ अध्यक्ष श्री.अविनाश ओंबासे सर यांच्या हस्ते मनस्वीला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

मनस्वी सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी, कात्रज पुणे येथे प्रशिक्षक विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शना खाली शिकत आहे. नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप पदक मिळविण्यासाठी मनस्वी एक वर्षापासून कठीण मेहनत घेत आहे.मनस्वी वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी नॅशनल स्केटिंग चॅम्पियन झाली असून येत्या काळात एशियन गेम्स सारख्या स्पर्धा मधून भारत देशासाठी नक्कीच सुवर्ण पदक मिळवेल.अशी आशा तिच्या पालकांनी व्यक्त केली.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.