वर्धा नदीच्या पात्रातील दांडगाव घाटा जवडील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव,
मित्रांसोबत वर्धा नदीवर पोहायला गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे.ही ह्रदय द्रावक घटना आज दि.26 मे ला मारेगाव तालुक्यातील दांडगाव जवळील घाटावर घडली.मृत पावलेल्या मुलाचे नाव मानव अविनाश राऊत वय 15 वर्षे असे आहे
सध्या उन्हाळी सुट्टी सुरू आहे.त्यामुळे या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुलं वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे.कोणी मोबाईल,कोणी खेळ,तर कोणी पोहायला सुद्धा जात आहे.अशातच मिळालेल्या माहितीनुसार वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील शनिमंदिर परिसरातील तीन समवयस्क विद्यार्थी दांडगाव येथील वर्धा नदीवर पोहण्यासाठी दांडगावच्या बाजूने आले.
दुपारी दोन वाजता ते तिघेही नदीमध्ये पोहायला उतरले.अशातच पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एक मुलगा नदीमध्ये बुडायला लागला.दुपारी दोन वाजता पाण्यामध्ये पोहायला उतरलेल्या मुलाचा अखेर पाच वाजता मृतदेह हाती लागला.या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे.त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असुन सर्वांनी आपल्या पाल्याला सांभाळून ठेवावे असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे.