कृषी विभागाचे आवाहन
सुरेश पाचभाई मारेगाव
शेतकऱ्यांनी बियाणे,खते कीट,तसेच कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी अर्ज करण्याचे आवाहन मारेगाव तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषद सेस फंड योजना 2024- 25,पंचायत समिती मारेगाव,कृषी विभागातर्फे वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी बियाणे खरेदी,खते किट तसेच कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट यासाठी सुद्धा अर्ज मागविण्यात आलेले आहे. 20 जुनपासून या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून 8 जुलै पर्यंत अर्ज
करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे तीन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी, यापूर्वी त्या शेतकऱ्याने या योजनेचा लाभ आधी घेतलेला नसावा, त्याच्याकडे जातीचा दाखला आणि रेशन कार्ड सुद्धा असावे. उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज आल्यास लाभार्थी निवड ही ईश्वर चिट्ठीद्वारे केली जाणार आहे.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी विभागातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे.