सुरेश पाचभाई मारेगाव
पोलीस विभागातून पस्तीस वर्ष अखंड सेवा केल्यानंतर दिनांक ३१ मे २०२४ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झालेलेल पोलीस उपनिरीक्षक पांडूरंगजी कवरासे यांचा सेवापूर्ती सत्कार शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून जेष्ठाकरीता क्रिडा व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जिल्हयातील अग्रणी संस्था मास्टर्स ॲथलेटीक्स स्पोर्ट ॲन्ड वेलफेअर असोशिएशन यवतमाळ व दारव्हा यांच्या वतीने शिलाताई पेंडणेकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव भोळे, प्रमुख अतिथी कार्याध्यक्ष देवेंद्र चांदेकर,उपाध्यक्ष देवानंद तांडेकर सचिव नरेंद्र भांडारकर,गोपाल उताने उपस्थितीत होते.सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पांडूरंगजी कवरासे पोलीस विभागात पांडूतात्या म्हणून परिचित आहेत त्यांनी पोलीस वसाहती मध्ये दरवर्षी वृक्षारोपण करून परिसर हिरवागार केला.शिवाजी महाराज जयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करतात

मास्टर्सचे उत्कृष्ट रनर आहेत या प्रसंगी एस बी आय च्या वतीने उत्कृष्ट कार्याबद्दल जे ओ टी सी मलेशिया पुरस्कार निवड,राष्ट्रीय मास्टर्स खेळाडू वेणूताई मोहतूरे व समता साहित्य अकादमीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त यशवंत ईसराणी व विजय घरडे यांचा सुद्धा सत्कार कण्यात आला.दारव्हा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र चितकुंटलवार, सदर संस्थेच्या महिला अध्यक्ष शिलाताई पेंडणेकर,शारीरिक शिक्षक संघटनेचे जितू सातपुते,

जिल्हापरिषद कर्मचारी पतसंस्था १०९ चे संचालक गजानन पोयाम, सचिन भेंडे, संजय सातारकर,पोलीस उपनिरीक्षक अमोल ढोकणे,अवि लोखंडे, धनराज लोखंडे,सचिन दरेकर,मिलींद दरेकर, प्रा.शितल दरेकर,प्रशांत पळसोकर,सचिन इंगोले, अरविंद वायकर,शोभा खडसे, वंदना कवरासे, सुत्रसेन भितकर,किसन दवारे, बंटी दरेकर,देवांगना मेश्राम,यशवंत होटे, भाऊ खवडे, पोलीस पाटील राजू डोफे, राजकुमार चौकसकर,नामदेव मेटकर ग्रामस्थ, मित्र मंडळी, नातेवाईक शिक्षक वर्ग आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सचिन बोरखडे तर अभारप्रदर्शन नरेंद्र भांडारकर यांनी केले.सर्वांनी यथोचीत सन्मान केला.