तालुका प्रतिनिधी :- वणी
तरोडा सुंदर नगर येथील DAV पब्लिक स्कूल मध्ये साप निघाल्याची एक शिक्षका कडून माहिती एम एच 29 हेलपिंग हँड्स संस्थेचे सर्पमित्र राजु भोगेकर यांना मिळताच यांनी क्षणाचाही विलंब न करता टिम मेंबर रमेश भादिकर , देवेंद्र भोगेकर यांच्या सह शाळेमध्ये पोहोचले.
पाहणी करीत असताना भारतीय अजगर हा साप आढळून आला. सर्पमित्रांनी योग्य प्रकारे ,मोठ्या शिताफीने पकडून डब्बा बंद ( भरणी ) मध्ये बंद केले. व शाळेतील शिक्षकांना व मुलांना योग्य माहिती दिली.अजगर या सापास वन्यजीव अधिनियम १९७२ च्या अंतर्गत परिशिष्ठ एक मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे याची हत्या किंवा छळ केल्यास 3 ते ७ वर्षांची कैद व १० ते २५ हजार दंड होऊ शकतो,आणी याचे कुळ पायथोनेडी असुन हा पुर्णपणे बिनविषारी साप आहे,हा भारतात सर्वत्र आढळतो.
वनविभाग मध्ये रितसर नोंद करून वनपरीक्षेत्र अधीकारी राजुरकर साहेब व कोडापे मैडम यांच्या उपस्थीतीत वनविभागाच्या संयुक्त विद्यामानाने वणी परिक्षेत्रात येत असलेल्या भालर येतील जंगलात सोडण्यात आले.