सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील वरुड येथील एका 35 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 21 जुलै 2024 रोज रविवारला दुपारच्या सुमारास घडली.
सतीष अशोक मंदे वय 35 वर्ष रा.वरुड असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.सतीश हा काल दि.21 जुलैला शेतात कपाशीवर फवारणी करण्यासाठी घरून दुपारी 1: 30 वाजताच्या सुमारास गेला होता.
सायंकाळचे 5 वाजले पण तो शेतातुन फवारनी करून घरी परत न आल्याने आई मुलाला पाहन्यासाठी शेतात गेली असता सतीष हा शेतात असलेल्या बोरवेल जवळील आर्थीनचे तारा जवळ पडुन दिसला.तेव्हा आई लगेच त्याला हात लावायला गेली असता त्यांना पण विजेचा धक्का बसून काही अंतर दूर फेकल्या गेले.काही वेळानी त्यांनी स्वतःला सावरून त्यांच्या मुलीला फोन करून घटनेची माहिती दिली.
सदर घटनेची माहिती मुलीला मिळताच तिने गावातील नातेवाईकांना लगेच शेतात पाठविले.नातेवाईक आल्या नंतर नातेवाईकांचे मदतीने आधी त्या परिसरातिल विजेचा पुरवठा बंद करून त्याला व आईला प्रथम उपचारा करिता नातेवाईकांनी लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पण तेथील डॉक्टरांनी सतीषला मृत घोषित केले.सतिश यांचे पश्चात आई,पत्नी,मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार अफजल पठाण करीत आहे.