– आगामी गणेश उत्सव पार्श्ववभूमीवर बैठक
– शहरात उत्सव काळात शांतता सुव्यवस्था कायम राहावी
– कोणताही अनुचित प्रकार घडू नये
सुरेश पाचभाई मारेगाव,
आगामी गणेश उत्सव सणाच्या पार्श्ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली दि. 6 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता बैठक घेण्यात आली.

आगामी गणेश उत्सव, दुर्गा उत्सव तसेच ईद -ए -मिलाद या काळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तालुक्यातील सर्व शांतता समिती सदस्य यांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी सर्व शांतता समिती सदस्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.