मारेगांवचे ठाणेदारपदी संजय द.सोळंके

0
1051

पूर्वीचे ठाणेदार शंकर पांचाळ यांची उमरखेड येथे बदली

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगावचे नवीन ठाणेदार म्हणून उमरखेड शहरचे ठाणेदार संजय सोळंके रुजू झालेले आहे.मारेगाव येथील ठाणेदार शंकर पांचाळ यांची प्रशासकीय कारणास्तव उमरखेड येथे  बदली झाल्याने संजय सोळंके हे रुजू झाले.

मागील 6 महिन्यापूर्वी मारेगाव पोलीस ठाण्याला रुजू झालेले ठाणेदार शंकर पांचाळ यांचा कार्यकाळ उल्लेखनीय होता.अनेक गुन्ह्यांची योग्य उकल त्यांच्या कार्यकाळात झाली.

आता त्यांची बदली उमरखेड येथे झाली असून त्यांच्या जागेवर उमरखेड येथून आलेले संजय सोळंके हे रुजू झालेले आहे. त्यांच्याकडूनही योग्य अशा कार्याची अपॆक्षा मारेगाव तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here