शुभम संजय काकडे सी.ए.परीक्षा उत्तीर्ण

0
943

वडील संजय काकडे पं. स. वणी येथे सहाय्यक अधिकारी

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव येथील संजय बबनराव काकडे, पंचायत समिती वणी येथे कार्यरत असून त्यांचा मुलगा शुभम संजय काकडे हा नुकताच सी. ए. (चार्टर्ड अकाउंटह) ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सदर परीक्षेचा निकाल 26 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झाला.

शुभम चे वडील संजय काकडे यांचे मुळगाव वणी तालुक्यातील वांजरी असून शुभम चे 10 वी पर्यतचे शिक्षण मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल येथे झाले.तर 12 वी पर्यतचे शिक्षण जवाहरलाल दर्डा कॉलेज यवतमाठ येथे झाले. शुभम ने बी. कॉम पद‌विचे शिक्षण ईस्काप कॉलेज नागपूर येथे केले.

बी.काँम पदविचे शिक्षण पूर्ण करतांना शुभम ने नागपूर येथून सीः ए साठी आवश्यक असणारी इंटर्नशिप’ यश- स्वीपणे पूर्ण करून सी.ए.परीक्षा उत्तीर्ण झाला.शुभम आपल्या यशाचे श्रेय वडील संजय काकडे,आई सुनिता काकडे, मामा ज्ञानेश्वर ढोके व मित्र परिवार यांना देतो. सामान्य कुटंब व ग्रामीण भागातील एक युवक सी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभमचे सर्वच स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here