खैरगाव येथे भव्य शंकरपटाचे उद्घाटन

0
1577

ऍड कुणाल चोरडिया यांच्या हस्ते उद्घाटन

एक लाख आठ हजाराची जंगी लूट

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील खैरगाव येथे यावर्षीही भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.वणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ता ऍड कुणाल चोरडिया यांच्या हस्ते आज दिनांक 24 मार्च 2025 रोज सोमवारला दुपारी 2:30 वाजता भव्य शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले.

तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खैरगाव गावचे सरपंच तुळशिरामभाऊ कुमरे होते.यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, माजी मुख्याध्यापक तुळशिराम पेंदोर, ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक) रविचंद्र जनबंधू, पोलिस पाटील सौ.मालाबाई कुमरे, गंगाधर आत्राम, सुनील गोवारदिपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या विशेष आवडीची असलेली ही बैलगाडीची शर्यत आहे. यानिमित्ताने तब्बल एक लाख आठ हजाराच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here