ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करून फार्मर आय डी काढून घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

0
458

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच,हंगामी पीक माहिती व भूसंदर्भीय भुभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रीस्टॅक या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

ॲग्रीस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पना आहे; जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते,आणि सरकार यांना एकत्र आणते यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते.ॲग्रीस्टॅक संकल्पने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्याचे काम सुरू आहे.

शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी काढून घ्यावयाचा आहे. हा फार्मर आयडी शेतकऱ्यांना पिक विमा, पिक कर्ज, पि एम किसान, किमान आधारभूत किंमत तसेच शासनाच्या सर्व योजनेकरिता बंधनकारक आहे.

भविष्यात ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच शासकीय अनुदाने व योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पुढील असुविधा टाळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपले सेवा सेतू केंद्रात जाऊन फार्मर आयडी काढून घ्यावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here