पत्रकार माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात

0
63

रुग्णांलयात फळे वाटप

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:- व्हाईस ऑफ मीडीयाचे वतीने पत्रकार माणिक कांबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत या कार्यक्रमाला,मारेगाव पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे,मारेगाव नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी शशिकांत बाबर, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता प्रफुल चिंतकुटलवार, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक सुभाष इंगळे अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट,

सराटी चे सरपंच  तुळशीराम  कुमरे, ज्योतीबा पोटे पत्रकार,दिलदार शेख पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजक व्हाईस आफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्ष ,पत्रकार प्रतिभा तातेड , पत्रकार कैलास कोडापे , व्हाईस ऑफ मिडीया जि.महासचीव पत्रकार कविता धुर्वे  यांनी यशस्वीरित्या नियोजन केले.

सायंकाळी 7 वाजता फळे वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विकास नागोरिया, डॉ.रविंद्र विणा,जयश्री इंगोले प्रभारी परीसेविका,मनिषा टोंगळे अधीपरीचारीका,सविता तंतलपाडे क्षकीरण, लिहीतकर पक्षसेवक, प्रतिभा राठोड,सतिष खोके,निलेश मोहुर्ले,ईत्यादींनी विशेष सहकार्य केले.

सकाळी 11 वाजता पंचायत समीतीच्या सभाग‌हात सरपंच सघटनेच्या वतीने  पत्रकार माणिक कांबळे यांच्या हस्ते केक कापुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी अखील भारतीय सरपंच संघटचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत कार्यक्रमाला संघटनेचे सचिव सुरेश लांडे,

वनोजा उपसरपंच प्रशांत भंडारी,सराटी चे सरपंच तुळशीराम कुमरे,  शिवणीचे सरपंच निलेश रासेकर, चिंचाळाचे उपसरपंच शशिकांत तावाडे,  पत्रकार रोहन आदेवार, सामाजिक कार्यकर्ता पवन ढवस,प्रविण बोतले पत्रकार प्रतिभा तातेड आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here