शेतकऱ्याचे अंदाजे 80 हजाराचे नुकसान
वेगाव येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर असलेल्या एका झाडाखाली उभ्या असलेल्या एका म्हशिवर वीज कोसळली. यात म्हैस जागीच ठार झाली. सदर घटना काल दिनांक 27 मे 2025 रोज मंगळवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याचे अंदाजे 80 हजाराचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.

वेगाव येथील अरुण नानाजी टोंगे यांच्याकडे 5 एकर शेती आहे .ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.उन्हाळा असल्यामुळे शेतात कोणतेही पीक नसल्याने त्यांची म्हैस शेतामध्ये चरायला नेऊन सोडली होती.
अशातच काल दि.27 मे ला दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले.आणि अचानक वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली.पाऊसही लागला.त्यामुळे शेतातील म्हैस हिने घराचा रस्ता धरला.आणि गावातील जि.प.शाळे जवळ असलेल्या कर्माचा झाडाखाली उभी राहिली.
अशातच वीज चमकली आणि कर्माचा झाडाखाली उभ्या असलेल्या म्हशीवर पडली.यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला.अचानक घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक डोंगर कोसळले असून शासनाकडून मोठया मदतीची अपेक्षा आहे.


