रोही आल्याने झाली अनेकांची धावाधाव
वनरक्षक व गावकऱ्यांनी रोह्याला पकडून वनविभागाच्या दिले ताब्यात
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे आज दिनांक 28 मे 2025 रोज बुधवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास रोही गावात शिरला. एकाएकी रोही गावात शिरल्याने अनेकांची धावाधाव झाली.अखेर अरविंद लांडे यांचे घराजवळ रोही (नीलगाय) याला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
जंगलात चरणारा रोही हा अचानक गावात आला. गावात येऊन लांडे यांच्या घराजवळ थांबला. रोही गावात शिरल्याची वनविभागाला माहिती दिली.माहिती मिळतात वनविभागाची कर्मचारी हिवरा (मजरा )येथे दाखल झाले. व रोह्याला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. यावेळी रोह्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

यावेळी वनरक्षक सुरेश लांबट, वनरक्षक सुभाष येरमे, वनरक्षक अक्षय सराटे, व गावातील पशुप्रेमी अरविंद लांडे,डॉ.पी.पी. बदकी,विशाल सोयाम,गोलू लांडे यांचे सहकार्याने रोह्याला सुखरूप पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पशु डॉक्टर यांनी सुद्धा रोहीचा प्राथमिक उपचार केला.


