पिसगाव ते पाथरी दरम्यान अपघात
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील पिसगाव ते पाथरी दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक ठार तर, एक जखमी झाल्याची घटना दिनांक 31 मे 2025 रोज शनिवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
मोहन जयराम पाचभाई वय अंदाजे 54 वर्ष रा. पिसगाव ता.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर शामराव मालेकार रा.भालेवाडी बेडा असे जखमी चे नाव आहे.
मोहन पाचभाई हे काल सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे कामासाठी दुचाकीने मारेगाव येथे गेले होते.तेथील काम आटोपून ते सायंकाळी पीसगावकडे येत होते. त्याचवेळी भालेवाडी येथील मालेकर हे भारधाव वेगाने दुचाकीने मार्डी कडून येत होते.अशातच पिसगाव ते पाथरी दरम्यान रस्त्यात यांच्या दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकल्या.या अपघातात मोहन पाचभाई ठार झाले. तर,एक जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच काही नागरिकांनी त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथामिक उपचारास दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील खासगी दवाखान्यात हलविले.पण तेथील डॉक्टरांनी तपासून मोहन यांना मृत घोषित केले.
सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळतात मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने पिसगाव येथे शोककळा पसरली. सदर घटनेचा तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर बारेकर करीत आहे.


