असंख्य झाडे कोलमडली,मार्की झरी,झरी घोन्सा मार्ग बंद
विजेचे खांब व तारा तुडल्या विजप्रवाह खंडीत
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी :मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दिनांक ९ जुलै रात्री विजांचा कडकडाट , सुसाट्याचा वाऱ्यासह पावसाच आगमण झाले आहे. कपासाची धुळ पेरणी करिता पाऊस फायदा चा होणार असुन पेरणीच्या कामाला ही वेग आला आहे. हा पाऊस शेती साठी उपयुक्त असाला तरी वादळी वाऱ्यांनी घरदार, गोठे , पॉलीहाऊस ,शेड , विधुत खांबाचे मोठे नुकसान झाले आहे.

रात्री रोद्र रूप धारण केलेल्या वादळीपावसाने शंभर वर्षे जुनी झाडे उन्मळू पडली आहे. मुकुटबन झरी मार्गावर मार्की बु ते मुच्ची फाटा दरम्यान रस्यावर मोठ झाड कोसळल्याने हा मार्ग दिवस भर बंद आहे. तर झरी घोन्सा मार्गावर आडकोली गावाजवळ सागवान वृक्षाची अनेक झाडे रस्यावर उन्मळून पडली त्यामुळे हा मार्ग रात्री पासुन बंद आहे.

या मुळे वणी झरी बस सेवा दिवसभरबंद बंद आहे. या मुळे या मार्गा वरिल प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे. जंगल परिसरात व शेतशिवारातील मौल्यवान सागवान वृक्ष कोसळल्याने वन विभाचे व शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सोबत इतरही झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुसाटाच्या वाऱ्यांने अनेकांच्या घरावरील गोठ्या वरिल पत्रे उडाली असुन अन्न धान्य,जनावारांचा चारा शेतात साठविलेले रासायनिक खत पावसाने भिजले आहे.खडकडोह,चिंचघाट,पवणार गणेपूर, पांढरकवडा ,अर्धवन,मार्की,जामणी या परिसाला यावादळी पावसाचा चांगला च तडाका बसाला असुन चोवीस तास उपर उलटूनही विद्यूत पुरवढा सुरळीत झाला नव्हतापरिणामी पाणी पुरवठा बंद असून विद्यूतवर चालणारी सारी यंत्रणा कोलमडून गेली आहे..


