सौर ऊर्जेचा खांब पडला, घराचे मोठे नुकसान
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चनोडा येथे वादळ वाऱ्याने रौद्ररूप धारण करून अनेकाच्या घरावरील छप्पर, जनावरांचे गोठे, विजेचे खांब तसेच विद्युत तार आणि झाडांचेही मोठे नुकसान झाले.

सदर घटना आज दिनांक 9 जून 2025 रोज सोमवारला दुपारी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चनोडा येथे घडली.यात शेतकरी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून बातमी लिहीपर्यंत कोणीही येथे भेट दिलेली नव्हती.

तालुक्यातील चनोडा येथे भयानक वादळाला सुरुवात झाली.या वादळाने एवढे रौद्ररूप धारण केले की यात चनोडावासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यामध्ये अनेकांच्या घरांची पडझड झाली. जनावरांचे गोठेही उडाले.

तर गावामध्ये असलेली अनेक वर्षापासूनची मोठी मोठी झाडे सुद्धा झाडे उन्मळून पडली. तसेच चनोडावासीयांना प्रकाश देणारा सौर ऊर्जेचा खांब सुद्धा उन्मळून पडला. गावातील विजेच्या खांबाचेही मोठे नुकसान झाले असून विजेचे तार सुद्धा तुटलेले आहेत.

चनोडा वासियांनी प्रथमच एवढ्या भयानक वादळ वाऱ्याचे रौद्ररूप बघितले. यात चनडा येथील भोलानाथ सिडाम, देवानंद काकडे, प्रेमानंद काकडे, वामन काकडे,बाबाराव महाकुलकर, तुळशीराम सातपुते, शंकर सातपुते, किशोर तुरंगे, शेषराव सातपुते, नीलकंठ आत्राम,अशोक सातपुते,शाम वाटेकर,

हर्षद काकडे,अनिल बुचुंडे, यांच्या घरावरील छप्पर उडाले. तर उमाकांत बदकी, रणजित बदकी,संतोष दातारकर ,राजू पाचभाई यांच्यासह अनेकांचे जनावरांचे गोठेही उडाले. यात चनोडावासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वृत्त लिहिपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिलेली नव्हती.



