कामासाठी आलेल्या 21 वर्षीय मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

0
1893

नवरगाव (धरण) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नवरगाव धरणाचे कॅनॉलच्या पुलाचे काम करण्यासाठी आलेल्या एका मजुराने कॅनलच्या बाजूला असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 18 जुन 2025 रोज बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

शेख समीर शेख जाफर वय 21 वर्षे रा.डयटणा ता.जि.परभणी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

नवरगाव धरण येथील कॅनल मध्ये पुलाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे.शेख समीर हा पुलाचे काम करण्यासाठी काही सहकार्यासोबत नवरगाव धरण येथे काम करण्यासाठी मुक्कामी आला होता.तो काम पण करत होता आणि सहकाऱ्यांना कामावर टिफिनचा डब्बा आणुन देण्याचे काम करायचा अशातच त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप कळू शकले नाही.

शेख समीरने आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट नाही. समीर चा मृतदेह शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. शेख समीरच्या आत्महत्येचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here