कोलगाव येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 5 जुलै 2025 रोज शनिवारला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्रमोद/जगण रूधाजी धोंगडे वय अंदाजे 45 वर्षे असे विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.प्रमोद याचे कडे 2 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती व रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.
सकाळी कुटुंबातील काही सदस्य शेतात गेले असता सदर घटना उघडकीस आली.त्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.बातमी लिये पर्यंत त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. आहे.मृतक प्रमोद यांच्या पश्चात आई,पत्नी, तीन मुली असा आप्त परिवार आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


