झरी तालुक्यातील शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा

0
411

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटेनामार्फत झरी तहसीलदार अक्षय रासने यांना 8 व 9 तारखेला शाळा बंद आंदोलनाबद्दल निवेदन देण्यात आले .शासनाने अनेक वेळा आश्वासन दिली असली तरी प्रत्यक्ष अमंलबजावणी बाबतीत अजुनही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

विशेषता टप्पा अनुदान संदर्भातील 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशानंतरही आर्थिक तरतुद न झाल्याने हजारो शिक्षक गेली 15 ते 20 वर्ष अतिशय तृटपुंच्या वेतनावर विद्यार्थ्याचे अध्यापन कार्य पार पाडत आहे .या पाश्र्वभूमीवर झरी शिक्षक समन्वय समीतिने दि . 8 व 9 जुलै 2025 रोजी शासनास पुर्वसुचना देत शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय व सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने संबंधीत आर्थिक तरतुद तात्काळ करावी.करीता झरीजामणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनास आमचा सक्रिय पाठींबा आहे.निवेदन देताना सुरेन्द्र गेडाम, महेन्द्र बाडलवार , प्रशान्त खुपाट, विठ्ठल मुंगेलवार, स्वपनिल पाईलवार , प्रविण भोयर, सुरज गान्लावार,

राजु सोमावार, मारोती सोनटक्के, महेन्द्र भोयर, जगदीश रानडे , संदीप पोटरकर, नरेश काटेखाये , सतिश लाकडे , शितल किनाके , व्यंकटरमण येल्टीवार, कुंदन ठावरी , देवीदास गायकवाड , नितीन कोगुरवार , धिरज घोटेकर , प्रविण चुक्कलवार , प्रविण कोहपरे , वामण सोप्परवार, विजय गोडे , विठोबा आगरकर , अविनाश रासमवार, एस. येलमुलवार इत्यादी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here