सुरेश पाचभाई मारेगाव
भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका शाखा मारेगावचे वतीने बुधवार 9 जुलैला दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाचे नेतृत्व कॉ.बंडु गोलर करणार आहे. या मोर्चातुन विविध मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.
यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मीळावा, बेरोजगाराच्या हाताला काम मीळावे,असंघटित कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणे,महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावे.अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टा द्या. व जमिनीवरून हुसकावून लावणे बंद करा.शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. व कापसाला दहा हजार रुपये भाव सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या. असंघटित संघटित कामगारांवर लादलेला नवीन श्रमसंहिता कायदा रद्द करा.

2017 हीट अँड रन कायदा रद्द करा.अंगणवाडी सेविका, बालवाडी, आशा, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत कामगार, मोलकरीण स., मदतनीस, वाहन चालक युनियन, मानधन नको वेतन द्या. सरकारी नोकर भरती ताबडतोब करा.शेती करता पांदण रस्ते.
करण्यात यावे व शेती पंपाला 24 तास मोफत वीज पुरवठा करा,20 टक्के व्याज लुटणाऱ्या पतसंस्थाची सहकार आयुक्तांनी मान्यता रद्द करावी ईत्यादी मागण्याचा समावेश असुन देशव्यापी या आंदोलनात पिडीत,वंचीत घटकानी सहभागी व्हावे असे आवाहन काॅ.भास्कर सपाट, शेख इरफान भाई, विलास ढुमणे, लता रामटेके, प्रफुल आदे, दत्तू कोहळे, राहुल रामटेके, यांनी केले आहे.


