कोसारा शिवारात महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई
तेरा ब्रास रेती जप्त
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव :रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने धडक कारवाई केली.ही कारवाई आज दि.17 जुलै 2025 रोज गुरुवारच्या रात्री 12:39 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
कोसारा परिसरातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मारेगाव तहसीलदार यांना मिळाली. त्यांनी सापळा रचित कोसारा शिवारातील सोईट तालुका वरोरा ते खैरी रोडवरुन रेतीने भरलेला ट्रक अवैध रित्या रेती उत्खनन करून वाहतूक करीत असताना पकडला.
ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केली.

यावेळी तलाठी गजानन वानखेडे, चैतन्यकुमार शिंगणे, सनदेवल कुडमेथे, विवेश सोयाम, विठ्ठल सरनाईक, शिपाई किशन वेले, कोतवाल दिलीप पचारे यांनी मोठ्या शिताफीने जवळपास 13 ब्रास रेतीची अवैध वाहतूक करीत असताना ट्रक संयुक्तपणे पकडून तहसील कार्यालय मारेगांव चे परिसरात लावण्यात आलेला आहे. ह्या कारवाईमुळे अवैध रेती व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.


