मारेगाव तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
32 पैकी 16 ग्रामपंचायत मध्ये महिलाराज
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत दिनांक 18 जुलै 2025 ला तहसील कार्यालय मारेगाव येथे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार इंगोले यांचे अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता काढण्यात आली.यात 32 पैकी 16 ग्रामपंचायतमध्ये महिलाराज निघाले असून अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचा सुद्धा दिसून येत आहे.
मारेगाव तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा काही महिन्यावर येऊन ठेपलेला आहे.त्यामुळे या ग्रामपंचायतीसाठी नव्याने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार उत्तम निलावाड आणि नायब तहसीलदार महेश रामगुंडे यांनी ही सोडत काढली.
यात तालुक्यातील वनोजादेवी ही ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली.तर गौराळा आणि टाकळखेडा या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांकरिता तर आकापूर आणि करणवाडी या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जमाती करिता आरक्षित निघालेल्या आहेत.

किन्हाळा,कोथूर्ला, खैरगाव (बु.),देवाळा, टाकळी या ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित निघालेल्या आहेत. तर कोलगाव, चिंचमंडळ, केगाव आणि मजरा या ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारण निघालेल्या आहेत.
सर्वसाधारण खुलामध्ये गाडेगाव,बोरी (बू.),कुंभा, नवरगाव, कोसारा,हीवरी, मांगरूळ, इंदिराग्राम आणि मार्डी या ग्रामपंचायती सर्व साधारण महिलांकरिता आरक्षित निघालेल्या असून चोपण, सावंगी को., सिंधी – महागाव, दांडगाव, वेगाव, शिवणी (धो.),कानडा, आपटी, हिवरा- मजरा या ग्रामपंचायती सर्व साधारण निघालेल्या आहेत.
“अनेकांचा हिरमोड”
सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आल्यानंतर तालुक्यातील महत्त्वाचे व राजकीयदृष्ट्या मक्तेदारी असलेल्या अनेक ग्रामपंचायत आरक्षणामध्ये विविध प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. तर काही ठिकाणी सरपंचपद महिलांना सुटल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे.


