सुरेश पाचभाई मारेगाव
महसुल क्षेत्रात येत असलेल्या बोटोनी येथे दिनांक 28 जुलै 2025 रोज सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा नवीन इमारत बोटोणी येथे एक दिवसीय समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या समाधान शिबिरात महसूल विषयक उत्पन्न दाखले,प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,सात बारा उतारा, नमुना आठ अ, फेरफार उतारा, वित्त व अन्न पुरवठा विभागाच्या वतीने शिधा पत्रिका, दुय्यम शिधा पत्रिका, निराधार दुरूस्ती योजना विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना, आधार अध्यावत,
निवडणूक विभागाकडून मतदान नोंदणी, आरोग्य तपासणी ,कृषी विषयक मार्गदर्शन,ग्रामविकास विभागाच्या वतीने जाॅब कार्ड व इतर माहिती विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या समाधान शिबिराला सकाळी 10 वाजता पासून सुरूवात करण्यात येणार आहे.
मारेगाव तालुक्यातील महसुल मंडळ बोटोणी अंतर्गत येत असलेल्या खालील 30. गावाकरीता दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परीषद शाळा नविन इमारत बोटोणी येथे या शिबिर (कॅम्पचे ) आयोजन करण्यात आले आहे.
त्या मध्ये जळका,अबोरा,पांडविहीर,बोटोणी,पांढरदेवी,करणवाडी,खडकी,
खापरी, हटवांजरी,धनपुर,म्हैसदोडका ,रोहपट,पेढंरी ,खैरगाव भेदि,आवळगाव ,कान्हाळगाव ,वंसतनगर,वाघदरा,दुर्गाडा, घोडदरा ,घोगुलधरा ,शिवानाळा ,खेकडवाई ,बुरांडा (ख),सराठी, खंडणी ,मेढणी ,गिरजापुर वन,मारेगाव वन , उचाटदेवी या गावांचा समावेश आहे.


