विनोद पेरकावार यांची म.रा. पोलीस पाटील असोसिएशन संघटना यवतमाळ जिल्हा सचिवपदी निवड

0
539

पोलीस पाटील संघटना व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

यवतमाळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संविधान चौक येथे दि.१९ जुलै रोजी  महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन यवतमाळ जिल्हा बैठक व पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

त्यावेळी राज्य अध्यक्ष  नंदकिशोर हिवसे राज्य समन्वयक अशोक गेडाम राज्य उपाध्यक्ष  प्रेमचंद राठोड राज्य कार्याध्यक्ष राहुल उके जिल्हा अध्यक्ष मुकुंद काशेटीवार व इतर सर्व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्हा सचिव पदी विनोद पेरकावार  यांची निवड सर्वानुमते  करण्यात   करण्यात आली आहे.

सर्वाचा आदर करणारे  मनमिळावू व प्रसन्न व्यक्तीमत्व असलेले झरी तालुकातील पोलीस पाटील विनोद पेरकावार यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत असुन अभिनंदन केले जात आहे.   पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील  राहणार असल्याले मत यावेळी पेरकावार  यांनी व्यक्त  केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here