सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत तालुक्यातील एकोणतीस गावांची कृषि विभागा द्वारे निवड झाली आहे. यापैकी काही गावांमध्ये सोयाबीन व कापूस पिकांच्या शेतीशाळा राबविण्यात येत आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा चंदन निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शेतीशाळांमधून शेतकऱ्यांना पिक संरक्षणाचे धडे देण्यात येत आहे. तालुका कृषि अधिकारी सुरेश बुटले यांच्या नियोजनातून मार्डी येथे सोयाबिन पिकाच्या शेतीशाळेचा दुसरा वर्ग नुकताच संपन्न झाला.

या वर्गात मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी सोयाबिन वरील चक्र भुंगा, खोड माशी या किडींच्या व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तसेच कपाशी वरील एकात्मिक किड नियंत्रण विषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली व प्रत्यक्ष सुरेश लखमापूरे यांचे शेतावर जाऊन निरीक्षणे घेण्यात आली.
यासोबतच सहायक कृषि अधिकारी विवेक पारधी यांनी सुरक्षित कीटकनाशके हाताळणी व फवारणी करतांना सुरक्षा किट चा वापर याविषयी शेतकऱ्यांना संबोधित केले. तसेच सहायक कृषि अधिकारी रोहित जुमनाके यांनी पिक विमा विषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन पिक विमा काढण्याचे आवाहन केले.
शेतीशाळेकरिता अशोक निमसटकर या यजमान शेतकऱ्यासह नंदकुमार कांबळे, तुकाराम येरगुडे, गणेश चौधरी, संजय गायधन व गोपाळ बावणे व गावातील इतरही शेतकरी उपस्थित होते.


