हिवरा मजरा येथील महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
834

सुरेश पाचभाई मारेगाव 

मारेगाव:तालुक्यातील वनोजा देवी महसूल मंडळातील मौजा हिवरा मजरा येथे आज दि 25 जुलै 2025 रोज शुक्रवारला महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ” ह्या कार्यक्रमा अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले.

ह्या शिबिराला उदघाटक म्हणून सरपंच सौ.आरती विशाल गाडगे अध्यक्ष म्हणून मा.उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव उपस्थित होते .प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मा महेश रामगुंडे ,नायब तहसिलदार महसूल ,मा नायब तहसीलदार विजय मत्ते,सौ.डीमनताई टोंगे सरपंच वनोजादेवी,राजेंद्र गाडगे पोलीस पाटील हिवरा मजरा, जि.प. शाळा हिवरा मजरा चे मुख्याध्यापक श्री.संजय इंगोले सर व सर्व वनोजा मंडळातील बि. एल. ओ. उपस्थीत होते.

प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भूमिका मा.महेश रामगुंडे यांनी मांडून ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विषद केला भर पावसात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला त्याबद्दल समाधान व्यक्त करून जास्तीत जास्त नागरिकांनी विविध विभागांच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रघुनाथ कांडरकर मंडळ अधिकारी कुंभा तर आभार मा.अरविंद पिंपळकर मंडळ अधिकारी वनोजा देवी यांनी मानले.मारेगाव तालुक्यात संततधार पावसाच्या सरी बरसत असतानाही आज सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देतांना प्रचंड उपस्थिती दर्शविली.मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र ,डोमीसाईल ,नॉन क्रिमीलेयर , दुय्यम शिधापत्रिका  यांचे वितरण करण्यात आले.

ह्या कार्यक्रमात महसूल विभागाच्या एकूण 374 प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले तर कृषी विभाग 26 ,आरोग्य विभागाच्या 201 तपासण्या ह्या शिबिरात करण्यात आल्या .तर 27 नागरिकांच्या आधारकार्ड अपडेट करण्यात आले , संजय गांधी विभागाचे 10 प्रस्ताव दाखल झाले तर पुरवठा विभागाकडे 45 प्रस्ताव दाखल झाले.

सेतू केंद्र मध्ये 89 प्रस्ताव दाखल झाले मोठ्या प्रमाणात दाखले , प्रमाणपत्र वितरण,विविध सेवांचा लाभ,सोयी सुविधांचा लाभ व विविध योजनांबाबत माहिती नागरिकांना ह्या समाधान शिबिरात मिळाली .त्यामुळे नागरिकांचे चेहऱ्यावर समाधान दिसून आले . शासनाच्या ह्या स्तुत्य उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली.

हया कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हिवरा मजरा गावाचे ग्राम महसूल अधिकारी,चैतन्य शिंगणे तसेच वनोजा देवी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी गजानन वानखेडे ,रवि ढेंगळे, संजय शिंदे, संदेवल कुडमेथे  तसेच ग्राम महसूल सेवक जगदिश कंनाके,बंडू लोहांडे, अमित सातपुते, प्रफुल काटकर, योगेश भट,मनिषा माथनकर यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here