सुरेश पाचभाई मारेगाव
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव समीतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उद्या 31जुलैला विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.शहरातील शेतकरी सुविधा केंद्रा मधील आयोजीत सोहळ्यात 10 वी शालांत परिक्षेत 80 टक्के तर 12 वी शालांत परिक्षेत 60 टक्क्यां वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
या गुणगौरव सोहळ्याचे उदघाटन उद्या दुपारी 12 वाजता वणी वर्धमान फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑपरेटिव सोसायटीचे डायरेक्टर विजयबाबु चोरडीया हे करणार आहे.एकदिवशी या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट हे राहणार असुन स्वागताध्यक्ष म्हणून यवतमाळ दुग्ध विकास विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक श्रीराम कुमरे हे राहाणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणुन मारेगाव दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल किन्हेकार, गुरुदेव भजन मंडळाचे दयाल रोगे,सराटीचे सरपंच तुळशीराम कुमरे, जिल्हा परिषद निवृत्त शिक्षक तुळशीराम पेंदोर, हे राहाणार असुन मारेगावचे तहलिदार उत्तम निलावाड,ठाणेदार उमेश बेसरकर, मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे,
मारेगाव वनपरिक्षेत्राधिकारी शंकर हटकर, मारेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, मारेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुहास ओचावार,विद्युत महवितरण विभागाचे अभियंता शामसुंदर कुर्रा, एकात्मिक महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर,
भारतीय स्टेट बँक चे व्यवस्थापक तुषार क्षीरसागर, हे आप आपल्या विभागाशी सबंधीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. उद्या 31 जुलै दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा विद्यार्थी सोहळा सुरु राहणार असुन उपस्थीतांसाठी भोजन व्यवस्था कार्यक्रम स्थळी करण्यात आली आहे.आयोजीत कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन या सोहळ्याच्या आयोजक प्रतीभा तातेड यांनी केले आहे.


