रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन 

0
422

मारेगाव – मार्डी रस्त्यावरील वाहतूक एक ते दीड तास खोळंबली

 प्रशासनातर्फे खड्डे बुजवण्यास सुरुवात

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव ते मार्डी रस्त्यादरम्यान असलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे  तसेच थांबवण्यात आलेले रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे या मागणीसाठी तालुका काँग्रेस तर्फे आज दिनांक 28 जुलै 2025 रोज सोमवारला अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले.

यावेळी काही काळ तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती.परंतु सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने हा वाद निवळला. अखेर या आंदोलनाला यश येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती.

नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेला आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिशय हलाखीचा असलेला मारेगाव ते मार्डी रस्ता. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे.त्यामुळे या रस्त्यावर पडून अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहे. या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षातर्फे तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, अंकुश माफूर,नगरसेवक आकाश बदकी यांनी दिलेला होता.

या निवेदनाच्या अनुषंगाने आज दिनांक 28 जुलै 2025 ला मारेगाव मार्डी रस्त्यात दरम्यान भालेवाडी फाट्याजवळ असलेल्या  खड्ड्यांमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यातर्फे अर्ध नग्न आंदोलनात सुरुवात झाली. या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे मारेगाव ते माडी दरम्यानची वाहतूक एक ते दीड तास खोळंबलेली होती. अखेर बांधकाम विभागाची उपअभियंता ओचावार खड्डे बुजविण्याचे आश्वासन देत लगेचच खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे आंदोलन संस्थगीत करण्यात आले.

“महिला झाल्या आक्रमक”आंदोलन सुरु असतांना महिलांची संख्या ही वाखाणण्याजोगी होती. यात पोलिसांनी रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिला ह्या आक्रमक बनून रस्त्यावर आडव्या झाल्या होत्या.

“रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास पूर्ण नग्न आंदोलन तालुकाध्यक्ष मारोती गौरकर” तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहे.यात तालुक्यातील दोघांना मार्डी ते मारेगाव रस्त्यादरम्यान जीव सुद्धा गमावावा लागलेला आहे. असे असताना सुद्धा प्रशासन आणि बांधकाम विभागाला जाग येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास लगेचच काही दिवसात पूर्ण नग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिला.

प्रतिक्रिया,

काम डिसेंबर 2023 ला मंजूर झाले.पैसे त्वरित मिळावे यासाठी काही ठेकेदार हे आंदोलन करीत आहे. ठेकेदारांचे पैसे शासनाकडे अडल्यामुळे ठेकेदारांनी काम सुरु केलेले नव्हते. आपण विभागामार्फत त्यांना तसे पत्र दिलेले आहे.सध्या खड्डे बुजविण्यासाठी मुरूम आणि चुरीच्या गाड्या बोलावलेल्या आहे. रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात येईल आणि पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येईल.सुहास ओचावार उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव

काँग्रेसने सुरू केलेल्या अर्ध नग्न आंदोलनाला काँग्रेसच्या वरिष्ठ तसेच दिग्गज नेत्यांनी भेटी दिल्या या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष  नरेंद्र ठाकरे, काँग्रेसचे नेते संजय खाडे, जयसिंग पाटील गोहोकर,जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना,पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, वसंत आसूटकर, रवींद्र धानोरकर, देविदास बोबडे,शंकर वऱ्हाडे,तुळशीराम कुमरे, गजानन खापणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here