सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियान अंतर्गत विजय बोबडे यांचे शेतात काल दिनांक 30 जुलै 2025 रोज बुधवारला दुपारी 1:30 वाजता सलग सोयाबीन पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या प्रात्यक्षिकास अक्षय सोनुले उप कृषी अधिकारी,सचिन आत्राम सहाय्यक कृषी अधिकारी ,तुषार मेश्राम सहाय्यक कृषी अधिकारी यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी सोयाबीन पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडींच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत (IPM – Integrated Pest Management) सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच,कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देखील शेतकऱ्यांना दिली.या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले व अधिक उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त केले.


