सुरेश दळवे वणीचे नवे पोलीस उपविभागीय अधिकारी
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क:- वणी
वणी: महाराष्ट्र राज्यातील 65 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी गृह विभागाने काढले असून वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी एस.डी.पी.ओ.गणेश रामचंद्र किंद्रे यांची बदली पोलीस उपअधीक्षक फोर्स वन, मुंबई येथे झाली आहे.
त्यांच्या जागेवर उपविभागीय पोलीस अधिकारी,हिंगोली ग्रामीण येथील सुरेश दळवे यांना वणी येथे पाठविण्यात आले आहे.एस.डी.पी.ओ.गणेश किंद्रे यांनी दिनांक 25 मे 2023 रोजी वणी उपविभागाचे(SDPO) म्हणून पदभार सांभाळला होता.
त्यांनी गेल्या 26 महिन्याच्या कार्यकाळात अनेक पेंडिंग गुन्ह्यची चौकशी करून आरोपींना कारागृहात पाठविले.आता नवीन अधिकारी सुरेश दळवे यांचे समोर उप विभागातील 5 पोलिस ठाण्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान आहे.


