सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यातील मजरा येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय मारेगाव कडून शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया-गळीतधान्य अंतर्गत संपन्न झालेल्या प्रशिक्षणात सोयाबीन, कापूस व तुरीवरील कीड रोगांबाबत जनजागृती करून कीड रोग व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना धडे देण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी सुरेश बुटले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी कापूस, सोयाबीन व तुर पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण, हुमणी व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना संबोधित केले व पिक विमा उतरविण्याचे आवाहन केले.

तसेच सहायक कृषि अधिकारी संगीता पेंदोर यांनी सुरक्षित कीटकनाशके हाताळणी व फवारणी करतांना सुरक्षा किट चा वापर याविषयी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे तालुका संसाधन व्यक्ती तसेच सोयागोल्ड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्यामल राऊत यांनी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली व योजनेत सहभागी होऊन अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी करण्याचे आवाहन केले.
तसेच विकास सोनटक्के यांच्यासोबत ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमात प्रशिक्षण साहित्यासह कीड रोगांवरील माहितीपत्रके शेतकऱ्यांना पुरविण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कृषि अधिकारी विकास झिने यांनी केले व आभार प्रदर्शन सहायक कृषि अधिकारी सौदागर यादव यांनी केले.
प्रगतिशील शेतकरी शंकर नागपुरे यांच्या शेतात संपन्न झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात सरपंच शोभा बोबडे, उपसरपंच अशोक देऊळकर तसेच रणजीत डुकरे, गणपत बोबडे विद्या खडसे, मनीषा बोबडे, प्रतिभा उईके, संगीता नागपुरे, रवींद्र गोहकार, प्रवीण किनाके, महेंद्र मुनोत, शशिकांत खंगार यांचेसह परिसरातील भरपूर शेतकरी उपस्थित होते.


