पांढरकवडा (पिसगाव )येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव )येथील शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोज बुधवारला दुपारी 2 ते 2.30 वाजताच्या सुमारास घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल रमेश फरताडे वय अंदाजे 35 वर्षे रा.पांढरकवडा (पिसगाव ) ता.मारेगाव असे वीजअंगावर पडून ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक शेतकरी अनिल हे आज सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे पिसगाव येथील शेत शिवारात असलेल्या शेतात डवरनीच्या कामा करीत गेले होते.पण दुपारी 2 वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक कमालीचा बदल झाला आणि पिसगाव परिसरात अचानक रिमझिम पाऊससाला सुरुवात झाली होती. अनिल यांच्याकडे तीन एकर शेती असल्याची माहिती आहे.

अशातच आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला व शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली. यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला.सदर घटनेने पांढरकवडा (पिसगाव ) परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतक शेतकऱ्याच्या पश्चात आई , एक भाऊ पत्नी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.


