आमदार संजय देरकर यांचे प्रशासनाला आदेश
सुरेश पाचभाई मारेगाव
अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत करा असे आदेश वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी प्रशासनाला दिले आहे. प्रशासन कामाला लागले असून त्यांनी तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन मृतकाच्या नातेवाईकांची विचारपूस करून तेथील उपस्थित रुग्णालयाचे प्रमुख अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून उद्या सकाळी पोस्ट मार्टम करून द्यावे असे सांगितले आणि तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.

काल दि. 6 ऑगस्टला वीज पडून मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव ) येथील शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. सदर घटनेत अनिल रमेश फरताडे वय अंदाजे 34 वर्षे रा.पांढरकवडा (पिसगाव ) ता.मारेगाव यांचा वीजअंगावर विज पडून मृत्यू झाला होता.
सदर घटनेची माहिती वणी विधानसभेचे आमदार संजूभाऊ दरेकर यांना मिळतात त्यांनी लगेच प्रशासनाला आदेश दिले.आदेश मिळतात लगेच प्रशासन ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल झाले. आणि मृतकाच्या नातेवाईकांची विचारपूस केली व शासनातर्फे मिळणारी मदत तात्काळ वितरित करण्यात येईल असे आश्वासन मारेगाव तहसीलचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले.


