बुरांडा कृषी विद्यालया जवळील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव वरून काम आटोपून आपल्या घरी परत जात असतांना एका दुचाकी स्वाराने उभ्या ट्रकला मागून धडक दिली.ही घटना आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला.

सदर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नारायण दौलत मुंगोले वय 55 वर्ष रा. हटवांजरी ता. मारेगाव असे आहे.

नारायण हे आज सायंकाळच्या सुमारास शेतातील फवारणीचे औषध आणण्यासाठी हटवांजरी येथून मारेगाव येथे गेले होते. फवारणीचे औषध घेऊन गावाकडे परत येत असताना बुरांडा (ख) स्टॉप पासुन जवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून धडक बसली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाले. रस्त्याने ये- जा करणाऱ्या काही नागरिकांनी त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.
सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.


