प्रशासनाला आली खडबडून जाग

0
793

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव च्या बातमीचा दणका

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: गेल्या उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढली होती.तापमान 40-45 अंशाच्या पार गेलेले होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळले होते.तिथे आता गचके निर्माण झाले असून यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी बातमी विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगावने प्रकाशित केली होती.

मे,जून, जुलै महिना संपला असून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली आहे. पावसाळा सुरु असला तरी उष्णता मात्र कमी झालेली नाही. दिवसेंदिवस उष्णता वाढत असून तापमानाच्या पाऱ्याने रस्ते सुनसान केले होते. याच उष्णतेच्या तीव्रतेमुळे रस्त्यावरील डांबरसुद्धा वितळायला लागला होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी असे दृश्य बघायला मिळत आहे.


तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या मारेगाव शहरात तर जागोजागी डांबर वितळले असल्याचे दिसत होते. शहराचा गाभा असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवरील असलेले डांबर वितळलेले होते.

अनेक जण त्या ठिकाणी पडले होते. याकडे स्थानिक प्रशासन सुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हते.त्यामुळे या बाबीकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.अशी बातमी विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कने लावली होती. त्या बातमीची दखल घेऊन बांधकाम विभागाने नागरिकांचे लचके तोडणारे गचके लेव्हल लावण्यास सुरुवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here