सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिवस “दीन कृषी दीन” या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात आला.
तसेच एक दिवसाचा मुक्काम करून गाव पातळीवरील विविध योजनांसंदर्भातील अडचणी सोडविण्याचे निर्देश मा.जिल्हाधिकारी महोदयांनी दिले होते. त्या अनुषंगाने सगणापुर येथे सहाय्यक कृषी अधिकारी तुषार मेश्राम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.सर्व प्रथम गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर श्री मेश्राम यांनी उपस्थित महिला शेतकरी व ग्रामस्थांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके अंशतः कमी करुण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी याबत मार्गदर्शन करुण एम.आर.इ.जी.एस (mregs)फळबाग ,स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची माहिती देण्यास आली.

विशेषतः फवारणी करताना घावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.सोयाबीन व कपाशी पिकांवरील रोग व किडींच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) संदर्भात तांत्रिक माहिती व उपाययोजना सांगण्यात आल्या. शेतकऱ्यांना फार्मर आयडी चे महत्त्व समजावून सांगण्यात आले व सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तयार करावा याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.
तसेच, गावातील कार्यरत शेतकरी गटांना संघटित पद्धतीने शेतीची कामे कशी करावीत, व शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटास उपस्थिती शेतकऱ्यांच्या कृषी विभागाच्या योजनांविषयी येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


