ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी ९ आगस्ट हा दिवस ‘ क्रांती दिन ‘ व जागतिक अदिवासी दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात आला.या निमित्ताने बहुल अदिवासी म्हणून ओळखल्या जात असलेल्या झरी जामणी तालुक्यात अनेक गावात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अनेक गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मार्की खु.याठिकाणी ” बिरसा मुंडा चौकात जागतिक अदिवासी दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनजी शेडमाके उपाध्यक्ष दत्तुजी मडकाम तर प्रमुख पाहुणे म्हणून मारोती कुसराम,नानुदादा कोडापे ,नागेश सोयाम हे होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून जल जंगल जमिन आणि भाषा , कला , आदिवासी संस्कृती संवर्धन करावे त्याच बरोबर आधुनिक शिक्षण आधुनिक ज्ञान आत्मसात करून विकास साधण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाला गावचे सरपंच दिवाकर उइके , उपसरपंच गजानन मिलमिले पत्रकार,विठ्ठल उइके ज्ञानेश्वर आवारी,गुलाब आवारी,जनार्धन मडावी , गंगाराम जुमनाके , मनोहर तलांडे , नथ्युजी कोयरे बाबाराव जांबुळकर , शंकर तोडासे यांचे अनेक मान्यवर उपस्थित हाते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीकरण्यासाठी प्रफुल परचाके , प्रशांत आत्राम , गौरव चिकराम , तुषार शेडमाके , युवराज मेश्राम आशिष उइके,पंकज आवारी , धनराज जुमनाके , राहुल कोयरे युवकांनी निलेश गेडाम,निखिल गेडाम इ. युवकांनी परिश्रम घेतले .


