सोयाबीन-कापूस पिकांवरील रोग-किड नियंत्रणासाठी आमदार संजयभाऊ देरकर यांचा तालुक्यात दौरा

0
961

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील लाखापूर, वनोजादेवी, वेगाव, पिसगाव, पाथरी व चिंचाळा परिसरात आज दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी सोयाबीन व कापूस पिकांवरील रोग-किड नियंत्रणासाठी शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

दिवसभर चाललेल्या या दौऱ्यात आमदार देरकर यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण शासनस्तरावर करण्याचे आश्वासन दिले.

या मार्गदर्शन सत्रात कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री. कछवे, कीटक शास्त्रज्ञ श्री. मगर तसेच वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील वनस्पती विकृती तज्ञ श्री. वसुले यांनी शेतकऱ्यांना रोग-किड व्यवस्थापन, उत्पादनवाढीसाठी लागणारी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात वेगाव येथे सकाळी ११.४० वाजता झाली. त्यानंतर पिसगाव, पाथरी, चिंचाळा, लाखापूर व शेवटी वनोजादेवी येथे पिकांची पाहणी व प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अनिल पाटील देरकर, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुटे, अभय चौधरी, मनोज वादाफळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी कु.दिपाली खवले, मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकार, उपकृषि अधिकारी विनायक जुमनाके, किशोर आत्राम आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन निखिल पवार, रणजित सोयाम, राहुल सोयाम व प्रज्वल घोडेस्वार यांनी केले.

यावेळी आमदार संजयभाऊ देरकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here