खापरी (खडकी) धबधब्यावर विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी

0
876

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:तालुक्यातील खापरी (खडकी) गावाजवळील निसर्गरम्य धबधबा भाविकांसाठी नवे आकर्षण ठरत आहे. गणेशोत्सव, गौरी पूजन व दुर्गादेवी विसर्जनासाठी मारेगाव, बोटोणी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत आहेत.

खडकी बस स्टॉपपासून अगदी जवळच असलेला श्रीराम टेकडीलगतचा हा धबधबा खुल्या व मोकळ्या जागेमुळे विसर्जनासाठी सोयीस्कर ठरत आहे. गाडी पार्किंगची मुबलक सुविधा उपलब्ध असल्याने भाविकांना कोणतीही अडचण येत नाही.

धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या नाल्यात वर्षभर पाणी असल्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक तेवढे पाणी सहज उपलब्ध होते. थंडगार पाण्यात स्नानाचा आनंद घेत भाविक धार्मिकतेसोबत निसर्गसौंदर्याचाही आस्वाद घेत आहेत. हिरवाईने नटलेला परिसर आणि वाहत्या पाण्याच्या धारांमुळे हे ठिकाण पर्यटकांनाही आकर्षित करत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, “विसर्जनासाठी एवढे स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठिकाण क्वचितच सापडते. वाढत्या गर्दीवरून हे ठिकाण लवकरच विसर्जनाचे प्रमुख केंद्र बनेल.”

“खापरी (खडकी) धबधबा आता केवळ धार्मिक विधींसाठीच नव्हे तर निसर्गप्रेमींसाठीही महत्त्वाचे आकर्षण ठरत असून मारेगाव तालुक्यातील एक उदयोन्मुख पर्यटनस्थळ म्हणून वेगाने पुढे येत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here