सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन प्रस्ताद अंतर्गत निवड झालेल्या आदर्श गणेश मंडळ २०२५ या सन्मानासाठी मारेगाव येथील समाजसेवा गणेश मंडळाची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तब्बल २७०० मंडळांमधून केवळ १७ मंडळांची निवड झाली असून, त्यात समाजसेवा गणेश मंडळाचा समावेश झाल्याने मारेगावमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ही निवड १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालय, यवतमाळ येथे झाली. पोलिस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या हस्ते मंडळाला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील इतर निवडलेल्या मंडळांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकारी, पोलीस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात समाजसेवा गणेश मंडळाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले. यामध्ये –मोफत आरोग्य शिबीर (३ सप्टेंबर) ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने
वृक्षारोपण (७ सप्टेंबर) पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था दारूबंदी व नशाविरोधी जनजागृती

डी.जे. टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमांचे कौतुक करत जिल्हा पोलीस दलाने मंडळाला आदर्श ठरवले. या सन्मानामुळे समाजसेवा गणेश मंडळाच्या कार्याला नवे प्रोत्साहन मिळाले असून, धार्मिक उत्सव सामाजिक ऐक्य व शिस्तबद्धतेने साजरा करण्याचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे.


