यवतमाळ जिल्ह्याचे झळाळते प्रतिनिधित्व – महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार्थी स्वाती किशोर ठेंगणे यांची उल्लेखनीय भूमिका
सुरेश पाचभाई मारेगाव
यवतमाळ, ता. २२ सप्टेंबर “विकसित महाराष्ट्र 2047” या भविष्योन्मुख संकल्पनेअंतर्गत विभागीय मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) मा. ऍड. श्री. माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा व क्रीडा संवाद कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने दमदार उपस्थिती नोंदवली.
या संवादात जिल्ह्याचे सक्रिय युवा प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्कार्थी कु. स्वाती किशोर ठेंगणे (कीर्तनकार, श्रीमद्भागवत व शिवमहापुराण कथा प्रवक्ता) यांनी युवकांसाठी दिशा दाखवणारे विचार मांडले. सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात युवकांची भूमिका अधोरेखित करताना ठेंगणे यांनी युवकांना क्रीडा, संस्कार आणि सेवाभाव यांचा संगम व राज्य तथा देशाच्या क्रीडा क्षेत्रात विकास साधण्याचे आवाहन केले.

मा. मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “महाराष्ट्रातील 2047 पर्यंतच्या विकसित महाराष्ट्राच्या उभारणीची खरी ताकद यामध्ये क्रीडाक्षेत्र देखील महत्वपूर्ण आहे” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. या संवादास जिल्ह्यातील अनेक युवक प्रतिनिधी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यरत कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात ठेंगणे यांचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या कार्याचे राज्यस्तरावर कौतुक व्यक्त करण्यात आले. युवकांनी नवउमेद व सकारात्मक उर्जेने महाराष्ट्र घडवावा, असा संदेश या संवादातून अधोरेखित झाला.


