ज्ञानेश्वर आवारी, झरी-जामणी
झरी-जामणी : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी, यवतमाळ जिल्हा सचिवपदी जितेंद्र डुकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीचे व्यापारी वर्गासह विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
डुकरे यांनी आतापर्यंत केलेले प्रामाणिक व निस्वार्थी कार्य, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि लोकहिताच्या कामाची तळमळ यामुळे त्यांची ओळख प्रभावी कार्यकर्त्याची निर्माण झाली आहे. याच कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हा सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

जिल्हाध्यक्ष राजू मोहनलालजी गुंदेचा यांनी नियुक्तीपत्र प्रदान करताना सांगितले की, “जितेंद्र डुकरे यांच्या कार्यामुळे व्यापारी आघाडी अधिक बळकट होणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी दिशा मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.
नियुक्तीची बातमी समजताच डुकरे यांच्या मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी व्यापारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ठिकठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होत असून “योग्य व्यक्तीला योग्य पद” मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
डुकरे यांची ही नियुक्ती भविष्यातील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी नवा टप्पा ठरेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


