नवरात्र उत्सव : शक्ती, संस्कृती आणि सकारात्मकतेचा संगम

0
326

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: नवरात्र हा उत्सव केवळ धार्मिक समारंभापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनात नवचैतन्य, स्फूर्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणारा पर्व आहे. नऊ दिवस देवीच्या नौ स्वरूपांचे पूजन करून नारी शक्तीचा सन्मान केला जातो. प्रत्येक देवीच्या रूपातून शौर्य, ज्ञान, समर्पण, करूणात्मता आणि न्याय यांसारख्या जीवनमूल्यांची प्रेरणा मिळते.

गावोगावी तसेच शहरांमध्ये दांडिया, गरबा, पारंपरिक संगीत, नृत्य, हस्तकला प्रदर्शन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत असून, समाजात ऐक्य, उत्साह आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत होते. यामुळे नवरात्र उत्सव हा सांस्कृतिक उर्जेचा महत्त्वपूर्ण सोहळा ठरतो.

हा काळ आपल्याला नकारात्मकतेवर मात करून सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची शिकवण देतो. देवीच्या सामर्थ्यांचा अंगीकार करून आपण वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात उन्नती करू शकतो.

याशिवाय, पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर दिल्यास निसर्ग संवर्धनाबाबत समाजात जागरूकता निर्माण होते. स्वच्छता, सजगता आणि सकारात्मकता या तीन गोष्टी नवरात्राच्या माध्यमातून सर्वदूर पसरतात.

नवरात्र हा केवळ उत्सव नसून शक्ती, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा उत्सव आहे, जो प्रत्येकाला नवचैतन्याची उर्जा देतो. विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगावच्या टीमकडून सर्वांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here