सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज (२५ सप्टेंबर, गुरुवार) तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली.
दुपारी एक वाजता बोटोनी येथील शेतकरी मारोती वखनोर यांच्या शेतात त्यांनी सर्वप्रथम पाहणी केली. त्यानंतर करणवाडी येथील शेतकरी श्रीधर काळे यांच्या रोड लगतच्या शेतात झालेल्या नुकसानीची तपासणी केली.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. उईके म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य तो मोबदला दिला जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.” असे आश्वासन त्यांनी दिले.
या दौऱ्यात नितीनकुमार हिंगोले (एस.डी.ओ. वणी), उत्तम निलावाड (तहसीलदार मारेगाव), भीमराव व्हनखंडे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती मारेगाव), एस. जे. बुटले (मंडळ कृषी अधिकारी), किशोर डोंगरकर (मंडळ कृषी अधिकारी, मारेगाव), श्याम वानखेडे (ठाणेदार, पोलीस स्टेशन मारेगाव),
सरपंच सौ. विमलताई उरकुडे, ग्रामसेवक कु. एस. काकडे, रजनीकांत पाटील पोलीस, अतुल सरोदे पोलिस ,विनायक जुमनाके कृषी सहाय्यक, ज्ञानेश्वर गाडगे कृषी सहाय्यक, प्रवीण उपाध्ये तलाठी करणवाडी, आर.आय.पिंपळकर साहेब, प्रदीप उंबरे, मनोज वादाफडे, शशिकांत बोडे, उपेंद्र गायकवाड, तुळशीराम बोबडे, शैलेश जीवतोडे,तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


