सालेभट्टी येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव येथील काम आटोपून सालेभट्टी येथे दुचाकीने परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात प्रशांत/परसराम शंकर नांदे (वय 38, रा. सालेभट्टी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास सालेभट्टी गावाजवळील टर्निंगवर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत नांदे हे गाडीचे फायनान्स भरण्यासाठी आले होते.मारेगावहून आपल्या गावाकडे दुचाकीने परत येत होते. सालेभट्टी गावाजवळील वळणाजवळ दुचाकीवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला आदळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ प्रशांत यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
प्रशांत नांदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने सालेभट्टी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


