जागतिक बालिका दिनी काळाचा घाला!

0
1837

सर्पदंशाने अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू — खंडणी गावात शोककळा

सुरेश पाचभाई मारेगाव

जागतिक बालिका दिनीच काळाने एका चिमुरडीचे जीवन हिरावून घेतले. मारेगाव तालुक्यातील खंडणी येथे शनिवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सर्पदंशाने अडीच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Two and a half year old girl dies of snake bite – Khadni village in mourning

मृत चिमुरडीचे नाव कु. स्नेहा दशरथ मडावी (वय २ वर्षे ६ महिने) असे असून, ती आजीसोबत पीठ गिरणीवर गेली होती. आजी दळण दळत असताना निरागस स्नेहा गिरणीच्या परिसरात खेळत होती. त्याचवेळी अचानक विषारी सापाने तिला चावा घेतला.

स्नेहाला तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. क्षणात खेळता बोलता जीव गेला आणि आनंदी खंडणी गावात हळहळ पसरली.

गावातील नागरिक, नातेवाईक व परिचितांनी या घटनेबद्दल खोल शोक व्यक्त केला असून, “बालिकेच्या निधनाने जागतिक बालिका दिन काळवंडला” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here